Balu Dhanorkar : धानोरकरांनी चक्क आपले ऑफिस राष्ट्रवादीला वापरायला दिले होते, अजित पवार झाले भावुक

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं आज पहाटे आजारपणामुळं निधन झालं
Ajit Pawar
Ajit Pawar

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं आज पहाटे आजारपणामुळं निधन झालं. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर राज्यस्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी एक किस्सा शेअर करत अजित पवार यांनी धानोरकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. (Ajit Pawar emotional Congress Lok Sabha MP From Maharashtra Balu Dhanorkar )

अजित पवार काय म्हणाले?

मी विरोधी पक्षनेते पद स्वीकारले तेव्हा पावसामुळे झालेल्या नुकसानीचा दौरा केला होता. तेव्हा ते स्वत: माझ्यासोबत शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत होते. राष्ट्रवादीचे चंद्रपुरात कार्यालय नाही हे त्यांनी ऐकले होते. माझे स्वत:चे कार्यालय आहे ते तुम्ही वापरावे, मी पवार साहेबांना मानतो. आपण एकत्र काम करायला हवे, असे ते म्हणाले होते.

मित्रपक्षाला आपले कार्यालय देणारा दिलदार नेता. धानोरकर यांच्या जाण्यामुळे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे. मी तिथे फिरताना पहायचो, त्यांचा मनमिळावू स्वभाव होता. आंदोलन करायचे तेव्हा आपली भूमिका यश येईपर्यंत रेटण्याच्या त्यांचा प्रयत्न असायचा. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Balu Dhanorkar Passed Away : कट्टर शिवसैनिक ते महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार; जाणून घ्या धानोरकरांचा थक्क करणारा प्रवास

तसेच, धानोरकर माझ्याकडे राष्ट्रवादीकडून खासदारकीचे तिकीट मिळावे यासाठी आले होते. मी त्यांना असे का करताय, तुम्ही काय तयारी केली आहे, असे विचारले होते. तेव्हा धानोरकर यांनी उद्धव ठाकरेंनी आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळेल, तयारीला लागा असे आदेश दिले होते.

परंतू, जागा वाटपामध्ये ती जागा भाजपाला गेली. यामुळे मी सर्व तयारी केलेली आहे, मला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी ज्याच्याकडे लोकसभेची जागा जाईल तिथून उमेदवारी हवी आहे, असे ते म्हणाले होते, असे अजित पवार म्हणाले.

काँग्रेसला राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती, परंतू धानोरकर यांनी दुसऱ्या पक्षातून येत विजय मिळविला होता. मी उपमुख्यमंत्री असताना त्यांची आणि त्याच्या आमदार पत्नीने आणलेली सर्व कामे केली. माझ्या चंद्रपुराचा कायापालट व्हायला हवा अशी त्यांची भूमिका होती. नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही, अशी भावना पवार यांना यावेळी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com