
Ajit Pawar News : "मोदी-शाहांना एकदा नव्हे दोनदा अजित पवारांनी बनवलं ‘उल्लू’"
महाविकास आघाडीची आज (१ मे) मुंबईतील बीकेसी मैदानात वज्रमूठ सभा होत आहे, या सभेविषयी बोलताना ही सभा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भोवती केंद्रीत असेल असेल असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरयांनी व्यक्त केलं. यावेळी सामान्य लोक ज्या मोदी-शहांना भीताता त्यांना अजित पवार यांनी उल्लू केलं असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
आजच्या सभेचं केंद्रस्थान हे अजित पवार राहणार आहेत, देशात असा एकच माणूस आहे ज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना एकदा नाही दोनदा उल्लू केलं असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ते साम टीव्हीशी बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ ग्रहन केली. आपल्याकडच्या सर्व केसेस बंद करून घेतल्या. कोर्टाला रिपोर्ट गेला आणि हा माणूस पुन्हा बाहेर पडला आणि उल्लूचं राजकारण त्यांनी सरळ करून दिलं. आताही भाजपला बोलायला लावलं आणि एक दिवस पुन्हा वक्तव्य केलं की, मी मरेपर्यंत राष्ट्रवादीसोबत राहाणार आणि पुन्हा दुसऱ्यांदा उल्लू केलं.
या उल्लूपणाचं राजकारण पाहाता सर्वसामान्य माणूस नरेंद्र मोदींना, अमित शहांना भीतो त्यांना उल्लू करणारा माणूस अजित पवार आजच्या सभेच्या केंद्रस्थानी असतील असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. उल्लू करणारा माणूस सेंट्रल स्टेजला आला आहे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राज्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी एक बॉम्ब फुटता फुटता वाचाला पण कर्नाटकच्या निवडणूकीनंतर आणखी एक बॉम्ब फुटेल असे सूचक विधान देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं.