Ajit Pawar: '...नाहीतर कानाखाली आवाज काढीन', अजित पवारांची पक्षातील नेत्यांना तंबी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar: '...नाहीतर कानाखाली आवाज काढीन', अजित पवारांची पक्षातील नेत्यांना तंबी

गेल्या काही दिवसांपासून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशातच काल अजित पवार यांनी नेत्यांची काम बघून तिकीट देण्याचं ठरवू असं म्हणाले आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी नेत्यांनी तंबी दिली आहे.

या बैठकीत अजित पवार यांनी नेत्यांना काही सूचना आणि विनंती देखील केली आहे. तर या बैठकीत बोलताना पवार यांनी 10 तारखेला असणाऱ्या वर्धापन दिनाच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. 'तुम्ही देखील मीटिंग घ्या, तयारी सुरू करा. आपल्यावर खूप मोठी जबाबदार आहे, मुळशीच्या लोकांनी देखील काम करायचं आहे. त्यांना देखील पद दिली आहेत. भाडायचं नाही, नाहीतर एका-एकाच्या कानाखाली आवाज काढीन, बाकी काय नाही करणार. यातुन आमची बदनामी होते. तुमची नाही असं म्हणत अजित पवारांनी नेत्यांना तंबी दिली आहे.

तर पुढे अजित पवार म्हणाले कि, 'तुमच्या वागण्यामधुन पवार साहेबांची, आमची बदनामी होते. नीट वागा. नाहीतर मी राजीनामा घेईल मी फार टोकाची भुमिका घेईन. एकदा तुम्ही पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. तुम्ही राष्ट्रवादी संघटनेचे पदाधिकारी म्हणुन त्या पदावर बसता. ते अलिकडे लगेच व्हिडिओ बनवतात, त्यामुळे केलेल्या कामाचा सत्यानाश होतो. केलेल्या कामावर पानी फिरवता, अशा घटना अजिबात घडता कामा नयेत. त्याबद्दल मी निर्वाणीचा इशारा प्रांत अध्यक्षांच्या समोर देत आहे. मी नंतर अजिबात कोणाचं ऐकणार नाही असंही अजित पवार म्हणाले आहेत.

पक्षातील सर्वानी लक्षात ठेवा. मतभेद असतात. पण आपल्यासोबत चांगला इतिहास, परंपरा असताना आपण पक्षाची बदनामी का करायची? पक्षाची बदनामी करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना मी सोडणार नाही. मी त्यांच्याकडून सगळी पद आणि जबाबदाऱ्या काढून घेईल असंही पवार यावेळी म्हणाले आहेत.