Maharashtra Budget Session 2023 : अंकल, काकीला सांगीन...; अजित पवारांनी भर सभागृहात महाजनांना डिवचलं! | Ajit Pawar in maharashtra budget session 2023 teases bjp girish mahajan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar in Budget Session
Budget Session 2023 : अंकल, काकीला सांगीन...; अजित पवारांनी भर सभागृहात महाजनांना डिवचलं!

Maharashtra Budget Session 2023 : अंकल, काकीला सांगीन...; अजित पवारांनी भर सभागृहात महाजनांना डिवचलं!

Maharashtra Budget Session 2023 News: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान आज कांदा प्रश्नावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. त्याचसोबत काही मजामस्तीचे क्षणही आज अधिवेशनात अनुभवायला मिळाले.

तर झालं असं की, अजित पवार सभागृहात बोलत होते. कांद्याचा प्रश्न, सरकारने जाहिरातबाजीवर केलेला खर्च या सगळ्यावरुन अजित पवार टीका करत होते. ते बोलत असतानाच गिरीश महाजन यांनी अजित पवारांना रोखलं, बोलताना अडवू लागले.

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

हे सुरू असतानाच पवारांच्या मागे बसलेल्या धनंजय मुंडे यांनी महाजन यांना अंकल अंकल म्हणत चिडवलं. ते ऐकून अजित पवारही आपल्या भाषणात म्हणाले, "अंकल अंकल काकीला सांगीन ...मग किती काकी आहेत ते बघावं लागेल मग." यानंतर मात्र सभागृहात मोठा हशा पिकला.