मंत्रिमंडळातील सदस्यांची बेताल वक्तव्ये थांबवा : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिल्लीला जाईल. त्यानंतर यावर योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्यातील मराठा आरक्षणाचा हा मुद्दा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जायला हवा. तसेच आरक्षण असे हवे जे न्यायालयात टिकेल.

- अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिल्लीला जाईल. त्यानंतर यावर योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्यातील मराठा आरक्षणाचा हा मुद्दा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जायला हवा. तसेच आरक्षण असे हवे जे न्यायालयात टिकेल. राज्यातील मंत्र्यांच्या विविध वक्तव्यांमुळे संभ्रमावस्था निर्माण होत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :

- आरक्षणासाठी शिवसेनेची मदत लागेल. त्यावर मतदान होऊ शकते.  

- मराठा आरक्षणाचा हा मुद्दा पंतप्रधान मोदींकडे मांडण्याची गरज

-  मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर 307 आणि 353 कलम लावण्यात आले आहेत. 

- त्यामध्ये अनेक तरूण आहे.

- यातील बहुतांश जण शिक्षण घेणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या भवितव्याचा विचार करून हे कलम मागे घेण्याची मागणी करणार आहे.

- राज्यातील मंत्र्यांच्या विविध वक्तव्यांमुळे संभ्रमावस्था निर्माण होत आहे.

- तसेच फोनवर साप आणि विंचू सोडण्याची भाषा केली जाते. आता 'दूध का दूध पाणी का पाणी होना चाहिए'

- महाराष्ट्राची अवस्था हाताबाहेर गेली. मुख्यमंत्र्यांना विनंती की हे सर्व थांबवावे.

- आम्ही 16 टक्के मराठा आणि 5 टक्के मुस्लिमांना आरक्षण दिले. 

- महाराष्ट्रात शांतता नांदावी, अशी आमची इच्छा आहे.

- आत्महत्या करून काही होत नाही. शांततेने सर्व प्रश्न सुटू शकतात. प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे.

- सध्या समाज आमच्यावरही नाराज आहे.

-  आमच्याविरोधातही वक्तव्ये केली जात आहेत.

- ज्या गोष्टी करता येईल. त्या राज्य आणि केंद्र सरकारने कराव्यात. 

- आम्हाला यामध्ये राजकारण करायचे नाही.

- आरक्षण मिळावे, अशी सगळ्यांची इच्छा.

- सरकार म्हणून योग्य भूमिका असावी.

- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस येत्या सोमवारी आयोगाला भेट देणार 

- केंद्रात बहुमत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार

- चार वर्षांत मोठी पावले उचलणे गरजेचे होते. मात्र, तसे केले गेले नाही.

Web Title: Ajit Pawar on Maratha Reservation Issue