अजित पवारांना मिळणार 'हे' पद; आघाडीच्या बैठकीला हजर

टीम-ई-सकाळ
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. उद्या मुख्यमंत्र्यासह आणखी दोन जण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. उद्या मुख्यमंत्र्यासह आणखी दोन जण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंना मिळणार 'ही' मंत्रीपदं?

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध बंड करत भाजपशी हाततमिळवणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी शपथ घेतली होती. मात्र, तीन दिवसानंतरच त्यांनी राजीनामा दिल्याने भाजपचे अल्पमतातील सरकार कोसळले होते. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपचे अल्पमतातील सरकार कोसळल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चि झाले असून उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील हे निश्चित आहे. यात अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील. अजित पवार यांनी आज होणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीलाही उपस्थिती लावली आहे. उद्या सायंकाळी शिवतीर्थावर हा शपथविधी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit pawar may Deputy Chief minister of maharashtra