Ajit Pawar: कॅमेरे बघताच अजित पवारांनी ठोकली धूम; काय आहे कारण?

माध्यमांच्या प्रश्नाला नेहमी सडेतोड उत्तर देण्याऱ्या पवारांनी आज मात्र पळ काढला
Ajit Pawar
Ajit Pawar

माध्यमांच्या प्रश्नाचा नेहमी सडेतोड उत्तर देणारे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कॅमेरे पाहताच पाठ फिरवली. पवारांची ही भूमिका पाहात राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Ajit Pawar media cameras pune Morning Swearing )

गेल्या काही दिवसांपासून पहाटेची शपथविधी पुन्हा चर्चेत आली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा करण्यात आली होती. असा खुलासा केल्यानंतर या चर्चेने अधिक जोर धरला आहे. अशातच आज पुण्यातील एका कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते. मात्र, त्यांनी माध्यमांकडे येणं टाळलं.

नेहमीप्रमाणे कार्यक्रम पार पडल्यानंतर माध्यम प्रतिनिधी अजित पवार यांची वाट पाहात होते. कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार लिफ्टमधून खाली आले. पवारांना पाहताच प्रतिनिधीं त्यांच्याकडे जाणार तेवढ्यात कॅमेरे पाहून अजित पवार क्षणात गाडीत बसून गेले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथ विधी वरुन केलेल्या गौप्यस्फोट नंतर अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com