अजित पवारांकडे आता 'हे' मंत्रिपद?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

अजित पवार यांच्याकडे सहकार मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदासोबत अजित पवारांकडे सहकार क्षेत्राची जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबई : कायमच आपल्या आवतीभोवती मिडीयाला ठेवणारे नेते म्हणजे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार होय. ते गेल्या महिनाभरापासून सारखेच चर्चेत आहेत. आता ते मंत्रीपदावरून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजित पवार यांच्याकडे सहकार मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदासोबत अजित पवारांकडे सहकार क्षेत्राची जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा

आज विधानसभा अध्यक्ष व विरोधी पक्षनेत्याची निवड पार पडली आहे. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप बाकी आहे. मात्र त्याआधीच अजित पवार अॅक्शन मूडमध्ये दिसत आहेत. यंदाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अजित पवारांनी सहकार विभाग आणि साखर विभागाच्या प्रशासनाकडून आढावा घेतला.

भाजपची माघार; नाना पटोले विधानसभेचे बिनविरोध अध्यक्ष!

दरम्यान, साखर कारखाने 25 तारखेपासून सुरु झाले आहेत, मात्र काही कारखान्यांच्या अडचणी आहेत, हार्वेस्टिंग आणि इतक काही समस्या असल्यामुळे त्यासाठी निधीची गरज आहे. या समस्यांसंदर्भात तोडगा काढण्याची गरज आहे, असं मत अजित पवारांनी एका वृत्तावाहिनीशी बोलताना व्यक्त केलं.

भाजपला हरवण्याचं उद्धव ठाकरेचं महासत्तानाट्य

सहकार विभाग आणि साखर आयुक्त विभागाला एकत्र येऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. ऊसतोड झाली पाहिजे, कारखाने बंद पडू नयेत, कारण रोजगाराचा प्रश्न आहे. त्यामुळे सकारात्मक भूमिकेचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले.

भाजपच्या सापळ्यातून सुटका; शिवसेैनिकांना बळ

उपमुख्यमंत्रिपदासाठी सुरुवातीला जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. अजित पवारांनी बंड पुकारल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता कमी होती. परंतु दरम्यानच्या काळात अजित पवारांचे पुन्हा रुसवे-फुगवे झाल्यामुळे त्यांच्याकडेच उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा

गंमत म्हणजे अजित पवार यांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे  अजित पवार आधी एका पक्षासोबत आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना दिसतील, तेही अवघ्या काही दिवसांच्या अंतराने. मात्र अद्याप अधिकृत घोषणा बाकी असल्याने राष्ट्रवादीकडून नेमकं कोण उपमुख्यमंत्री होणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit pawar ministry decided likely to get cabinet ministry of co operation