राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत अजित पवारांचंही नाव?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचे हजेरीचे पत्र सादर करून, अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, या धक्कादायक घाडामोडीनंतर गेल्या 30 तासांत पुलाखालून बरच पाहणी वाहून गेलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेऊन, अजित पवार यांची विधिमंडळ पक्ष नेते पदावरून हकालपट्टी केलीय. त्यानंतरही अजित पवार अद्याप पक्षात कायम आहेत. पक्षाच्या यादीत अजूनही अजित पवार यांचे नाव आहे.

मुंबई  - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचे हजेरीचे पत्र सादर करून, अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, या धक्कादायक घाडामोडीनंतर गेल्या 30 तासांत पुलाखालून बरच पाहणी वाहून गेलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेऊन, अजित पवार यांची विधिमंडळ पक्ष नेते पदावरून हकालपट्टी केलीय. त्यानंतरही अजित पवार अद्याप पक्षात कायम आहेत. पक्षाच्या यादीत अजूनही अजित पवार यांचे नाव आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

कालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मोठ्या घडामोडी झाल्या. आमदारांनी एकमताने अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी केली. तसेच विधिमंडळातील सर्व निर्णयांचे अधिकार राष्ट्रवादीने जयंत पाटील यांना दिले. अद्याप सभागृहातील कामकाज सुरू झालेले नाही. विधानसभा अध्यक्ष निवड झालेली नाही. त्यामुळेच नियमानुसार पक्षाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती राज्यपालांना देणे गरजेचे आहे. त्यामुळेच आज स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पक्षाच्या निर्णयांचे पत्र दिले. जयंत पाटील यांनी राज्यपालांना दिलेल्या आमदारांच्या यादीत आश्चर्यकारकरित्या अजित पवार यांचेही नाव आहे.

फडणवीसांना तात्पुरता दिलासा; उद्या पुन्हा होणार सुनावणी

अजित पवार यांची मनधरणी करायला आलोय 
दरम्यान, पक्षाबाहेर एकटे पडलेल्या अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न आज दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीकडून सुरू होता. त्यासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात जयंत पाटील म्हणाले, 'सर्व आमदार आता आमच्या संपर्कात आले आहेत आता अजित दादांनी एकटे बाहेर राहू नये. त्यामुळं आम्ही त्यांची मनधरणी करण्यासाठी आलो आहोत.' दरम्यान, आज सकाळी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट का घेतली याविषयी माहिती नाही, असे जयंत पाटील यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar name still in ncp list jayant patil