शिवसेना ही गांडुळाची औलाद - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

गडहिंग्लज - भाजपबरोबर पटत नाही असे सांगणारी शिवसेना सत्तेतून मात्र बाहेर पडत नाही. कॅबिनेटमधील निर्णयाला शिवसेना मान्यता देते. परंतु त्या निर्णयामुळे जनतेत अस्वस्थता वाढायला लागली, तर हीच शिवसेना विरोधात बोलते. या पक्षाची अवस्था गांडुळाच्या औलादीसारखी झाली आहे, अशी घणाघाती टी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. 

भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे सुरू असलेल्या चौथ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवसाचे हल्लाबोल आंदोलन आज झाले. त्यानिमित्त नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे झालेल्या हल्लाबोल सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप-शिवसेना सरकारवर टीकेचा भडिमार केला. पवार म्हणाले, ""भाजपने सत्तेवर येताना अनेक घोषणा केल्या. परंतु साडेतीन वर्षे झाली तरी एकही घोषणा अमलात आली नाही. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण, महिला अशा सर्वच घटकांची त्यांच्याकडून फसवणूक सुरू आहे. शेतीमालाला भाव नाही. दुधाला दर नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत. साखरधंदा रसातळाला नेला. शिक्षणाचा पुरता बोजवारा उडवला. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना, "जीएसटी'मुळे व्यापाऱ्यांना या सरकारने घाईला आणले.'' माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, ""देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक व त्यानंतर आतापर्यंत किमान दोन हजार आश्‍वासने दिली असतील. परंतु त्यातील एकही घोषणा पूर्ण झाली नाही. यामुळे सामान्यांच्या मनातून हे सरकार उतरले आहे.'' या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर आदी उपस्थित होते. 

Web Title: ajit pawar NCP halla bol campaign shivsena Gadhinglaj news