Ajit Pawar: 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणेच्या तपासावर अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar
Ajit PawarSakal

पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार घडल्यानंतर या घटनेचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर पुण्यातील पाणी प्रश्नावरसुद्धा त्यांनी वक्तव्य केलं आहे.

(Ajit Pawar On PFI)

महाराष्ट्रात आणि देशात कुठेही पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देता कामा नये, अशा आरोपींवर लवकर कारवाई झाली पाहिजे, यासंदर्भातील तपास सरकारने लवकरात लवकर संपवावा आणि कारवाई करण्यात यावी. हा तपास लांबवण्यात काही कारण नाही असं मत व्यक्त करत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न असूनही सरकार या प्रश्नावर बोलत नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे.

Ajit Pawar
RBI : होमलोन सहित इतर लोन महागणार? RBIचे पतधोरण आज होणार जाहीर

पुण्याचा वाढीव पाण्याची गरज आहे. मुळशी धरणाचे पाणी देण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच छगन भुजबळांनी सरस्वतीबद्दल केलेलं वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे असं ते म्हणाले. राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली पण अजून हातात मिळाली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर बच्चू कडू यांच्याकडून झालेल्या मारहाणीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com