...मग हायकमांडकडे निर्णय कळवू : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील चर्चा लवकर संपविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोणते नेते चर्चा करणार हे ठरविणार आहेत. आमच्यात एकवाक्यता असली पाहिजे. अजून आमच्यात चर्चा झालेली नाही.

मुंबई : महत्त्वाची पदं, खातेवाटपांसंदर्भात पहिली आमच्यात चर्चा होणे गरजेचे आहे. अजून काही चर्चा झालेली नसून, आता आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

कर्नाटकातील 'ते' 17 आमदार अपात्रच; पण निवडणूक लढवू शकणार

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या घडत असलेल्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे. आज (बुधवार) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची वाय. बी. चव्हाण सभागृहात बैठक  झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सध्याच्या स्थितीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, की महाराष्ट्रातील चर्चा लवकर संपविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोणते नेते चर्चा करणार हे ठरविणार आहेत. आमच्यात एकवाक्यता असली पाहिजे. अजून आमच्यात चर्चा झालेली नाही. आजपासून जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे ठरवतील कधीपासून चर्चा करायची. चर्चेतून मार्ग काढण्यात येईल. त्यानंतर आम्ही हायकमांडकडे निर्णय कळवू. कॉमन मिनिमम प्रोग्राम, फॉर्म्युल्याबाबत चर्चा होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दिल्लीत असतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar opens up on current situation of Maharashtra politics and NCPs stand