कोरोनाच्या काळात कामात अडचणी येणार नाहीत- अजित पवार

प्रत्येक दवाखान्यात ऑडिटर नेमले जातील. रुग्णांची आर्थिक लूट होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे
ajit pawar
ajit pawarajit pawar

उस्मानाबाद: कोरोनासंबंधी ज्या सेवा सध्या दिल्या जात आहेत त्याला लागणारी वीज असेल किंवा इतर सर्व अडचणी येणार नाहीत. यामध्ये रस्त्यांची सोय, पाण्याची अडचणी असतील तर त्या लवकर सोडवल्या जातील. तसेच राज्यात सध्या ब्लॅक फंगसच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे, ही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी उस्मानााबादेत पत्रकार परिषदेत दिली.

प्रत्येक दवाखान्यात ऑडिटर नेमले जातील. रुग्णांची आर्थिक लूट होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. जिथं संसर्ग वाढत आहे तिथं चाचण्या वाढवल्या जात आहेत. सध्या ज्या जिल्ह्यात कोरोनाची जास्त बाधा आहे तिथं पाहणी करत असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

ajit pawar
आष्टीत आढळला मृत बिबट्या, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

तसेच शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. कर्जाचे योग्य वाटप केले जाईल. पीक कर्ज सर्व शेतकऱ्यांना मिळेल याची काळजी घेतली जाईल, असं पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com