‘तू मार, मी रडतो’चा डाव - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पिरंगुट - ‘‘भाजप आणि शिवसेनेची भांडणे ही खरेच मनापासून आहेत की ‘तू मार मी रडतो ’ असा त्यांचा डाव आहे हेच कळत नाही. मुळशीचा पाण्याचा प्रश्न असो की धरणग्रस्तांचा प्रश्न असो भाजपने कधी मिटविलेत,’’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

या सरकारने सत्तेचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी चालवलाय. निवडणूक आली, की त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात. अशी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका ही त्यांनी केली.  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारानिमित्त घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथील चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, ‘‘पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी नव्या व जुन्यांचा समन्वय साधून उमेदवारी देणार आहे. उमेदवारी न मिळणाऱ्यांना अन्य संस्थांवर सामील करून घेण्यात येईल. जनमानसात प्रतिमा असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.’’

निष्ठेला महत्त्व द्या...
माण - हिंजवडी गटातील उमेदवाराच्या निवडीबाबत पवार म्हणाले, ‘‘सर्वांचे लक्ष माण - हिंजवडी गटाकडे लागले आहे. कुणाला जिल्हा परिषद मिळणार  शंकरभाऊ मांडेकर की सुरेशभाऊ हुलावळे? जरा दमाने घ्या. इकडं नाही मिळालं की तिकडं जाणार, तिकडं नाही मिळालं की आणखी तिकडं जाणार. नुसतं इकडून तिकडं, तिकडून इकडं असं काही करून चालणार नाही. जरा निष्ठेला महत्त्व द्या.’

Web Title: ajit pawar in pirungat