Ajit Pawar Statement: नरेश म्हस्केंच्या आरोपांवर अजित पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर; म्हणाले असल्या आलतू फालतू...

Shivsena News: शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
Ajit Pawars Statement on Naresh Mhaske
Ajit Pawars Statement on Naresh Mhaskeesakal

Ajit Pawar News: शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात पवार घराण्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत चर्चेला उत आला आहे. मात्र नरेश म्हस्के यांच्या आरोपांना अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawars Statement on Naresh Mhaske
Shivsena News: "हातपाय तोडून हातात देईल, पंतप्रधानांकडे तक्रार कर" शिवसेनेच्या माजी आमदारची ऑडिओ क्लिप व्हायरल

माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी नरेश म्हस्के यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले की, "कोण नरेश म्हस्के मी त्यांना ओळखत नाही, त्यामुळे असल्या आलतू फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही, आणि आम्ही घरामध्ये अशा पद्धतीने कधीच वागत नाही.

अजित पवारांची भूमिका स्पष्ट असते.अशी घटना माझ्याकडून घडणार नाही तो माझा पुतण्या आहे, माझा मुलगा असल्या सारखा आहे. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी दिली आहे.

Ajit Pawars Statement on Naresh Mhaske
High Court: शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा झटका; आमदार निधी वाटपाला स्थगिती

नरेश म्हस्केंनी अजित पवारांवर काय आरोप केला होता?

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीमध्ये रोहित पवार यांना पाडा असं सांगण्यासाठी अजित पवार खुद्द अनेकांना फोन करत होते असा खळबळजनक दावा म्हस्के यांनी केला. तसेच, तुम्ही आधी तुमच्या घरातलं पाहा नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करा. असही म्हस्के यावेळी म्हणाले.

जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली. या अगोदर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली.

खासदार शरद पवार यांनीसुद्धा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. भाजपकडूनही निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. यात भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी या निवडणुकीसाठी त्यांनी युती केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com