Ajit Pawar : 'आता आम्ही मोठा अन् काँग्रेस लहान भाऊ'; जागा वाटपावरुन अजित पवारांनी पटोलेंना डिवचलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar : 'आता आम्ही मोठा अन् काँग्रेस लहान भाऊ'; जागा वाटपावरुन अजित पवारांनी पटोलेंना डिवचलं

Ajit Pawar : 'आता आम्ही मोठा अन् काँग्रेस लहान भाऊ'; जागा वाटपावरुन अजित पवारांनी पटोलेंना डिवचलं

कोल्हापूरः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हापूमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी अजित पवारांनी काँग्रेसवर निशाणा साधला. नाना पटोलेंनी काल केलेल्या विधानाचा अप्रत्यक्षरित्या त्यांनी समाचार घेतला.

कोल्हापूरमध्ये बोलतांना अजित पवार म्हणाले की, आपल्याला महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचं काम करायरचं आहे. तुमची जास्त ताकद असेल तर मविआमध्ये महत्व टिकेल. यापूर्वी काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या त्यामुळे वाटाघाटी करताना लहान भाऊ म्हणून आम्हांला भूमिका घ्यावी लागायची. आता मात्र वेगळी परिस्थिती आहे. आम्ही काँग्रेसपेक्षा मोठा भाऊ आहोत. काँग्रेसच्या ४४ जागा आहेत तर आमच्या ५४ आहेत. हे असं गणित आहे.

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, आता समविचार पक्षांनी एकत्र यावं लागणार आहे. कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलरची मतं घटली आहेत. भाजपची मतं आहेत तेवढीच आहेत. थोडाफार फरक पडला असेल. परंतु जेडीयूची मतं घटून काँग्रेसकडे गेली. त्यामुळे त्यांना यश मिळाल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

नाना पटोले काल काय म्हणाले?

आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप असा सामना रंगणार आहे. मात्र, महाविकास आघाडीत जागावाटपावरुन गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप आघाडीत चर्चा झाली नाही. मात्र काँग्रेस पक्ष तयारीला लागला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "लवकरच हे प्रकरण निकाली काढले जाईल. २१ रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आहे, त्यात आम्ही आमचे ३ नेते पाठवू. सर्व जागा गुणवत्तेच्या आधारावर ठरवल्या जातील आणि समितीमध्ये चर्चा होईल.