अजित पवार म्हणतात... शांत राहा, थांबा व पहा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

- मी राष्ट्रवादी सोडली नाही

- शरद पवार साहेबांना आयुष्यात कधीही सोडणार नाही

- मी एक राजकीय भूमिका घेऊन भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला

- महाराष्ट्राच्या भल्यासाठीच मी निर्णय घेतला

सांगोला (सोलापूर) : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन राजकीय चर्चा केली. ""मी राष्ट्रवादी सोडली नाही. शरद पवार साहेबांना आयुष्यात कधीही सोडणार नाही. मी एक राजकीय भूमिका घेऊन भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही विघ्नसंतोषी लोकच पवार घराण्यात फूट पडल्याचे सांगत आहेत, पण तसे होणार नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठीच मी निर्णय घेत असल्याचे सांगुन श्री. पवार यांनी कार्यकर्त्यांनी शांत राहून थांबा व पहा'' असेही सांगितल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी "सकाळ" ला सांगितले. 

काका - पुतण्याचे व्टिटवाॅर, अजित पवारांचे म्हणणे शरद पवारांनी खोडले

आज मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष संतोष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांनी अजित पवार यांच्या निवास्थानी जाऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

धनंजय मुंडेनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, वाचा काय म्हणाले...

या भेटीचा तपशील सांगताना उमेश पाटील म्हणाले, ""अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडलेली नाही असे ते ठामपणे सांगत आहेत. मला उभे-आडवे चिरले तरी मी पवार साहेबांना कधीही सोडणार नाही. पण सध्या मात्र, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी माझी राजकीय भूमिका घेतली आहे. राज्याचा कारभार करण्यासाठी केंद्रीय निधीची गरज असून ती गरज भागविण्यासाठी भाजपसोबत जाणे हिताचे आहे. त्यामुळे मी माझी भूमिका घेतली आहे. कार्यकर्त्यांनी कोणीही संभ्रमात पडू नये. भाजपा व राष्ट्रवादीचे सरकार सभागृहात निश्‍चितपणे बहुमत सिद्ध करेल. ते सरकार पाच वर्षे स्थिर सरकार राहील असेही अजित पवार यांनी सांगितले.'' 

गोपीनाथ पडळकर म्हणले, अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतर...

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील किती आमदार अजित पवार यांच्या पाठीशी आहेत असे विचारले असता उमेश पाटील यांनी याबाबत अजित पवारच सविस्तर माध्यमांशी लवकरच बोलतील असे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar says ... Stay calm, wait and see

फोटो गॅलरी