Ajit Pawar : "राजकीय विरोधक आहेत म्हणून..." ; अजित पवारांनी सरकारला ठणकावून सांगितले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar on Shinde Fadnavis Government

Ajit Pawar : "राजकीय विरोधक आहेत म्हणून..." ; अजित पवारांनी सरकारला ठणकावून सांगितले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राजकीय विरोधक आहेत म्हणून कोणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी सहन करणार नाही, असे अजित पवार यांनी विरोधकांनी ठणकावून सांगितले. (Ajit Pawar on Shinde-Fadnavis Government)

सरकार मुळ विषयावरुन लक्ष हटवण्यासाठी नको तो वाद उकरुन काढत आहेत. राजकीय सूडापोटी कारवाई करणे चुकीचे आहे, असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी कटकारस्थान होत असल्याचा आरोप केला होता. यावर अजित पवार बोलत होते. 

हेही वाचा: Shivsena News: व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर सेनेच्या सत्ता संघर्षावर लागणार निकाल? कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी

अजित पवार म्हणाले, सत्ताधारी पक्ष वेगळ वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई आणि बेरोजगारी वरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

हेही वाचा: Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, तरुणांना कोयता पुरवणाऱ्या दुकानदाराला अटक

"चुकीचे घडले असेल तर कारवाई झाली पाहीजे. मात्र विरोधकांना त्रास देण्याकरीता जर कोणी कुणाला गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो कोणीही सहन करणार नाही. यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. कुणाला तरी उभं करुन केस करावी आणि नंतर त्यात सरकार लक्ष घालेल. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आम्ही अशा प्रकारचा प्रयत्न कधीही केला नाही," असे अजित पवार म्हणाले. 

हेही वाचा: Urfi Javed Chitra Wagh : "अशी कशी गं तू.."; उर्फीचं मराठीत ट्वीट अन् कमेंट्समध्ये भरलं कविसंमेलन