Ajit Pawar : "आज एका गोष्टीची खंत वाटते की…", अजित पवार असं का म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ajit Pawar

Ajit Pawar : "आज एका गोष्टीची खंत वाटते की…", अजित पवार असं का म्हणाले?

एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं हे थोड कमीपणाचं वाटत असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हंटलं आहे. महाराष्ट्र सरकारला ते शोभत नाही. नेमकी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हालाही आणि महिला वर्गाला योग्य वाटत नसल्याचे पवार म्हणाले आहेत.

सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. परंतु एका गोष्टीची खंतही वाटते. एवढा मोठा आपला महाराष्ट्र आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी एकही महिला मंत्रिमंडळात नसणं हे दुर्दैव आहे. ते कमीपणाचं वाटतं. महाराष्ट्राच्या सरकारला ते शोभत नाही असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

तर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मी अनेक वेळा जाहीर सभांच्यावेळी, मीडिया समोर या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहासमोर देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. पण काय अडचण आहे हे मला कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हाला आणि तमाम महिला वर्गाला देखील पटत नाही, अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हरभरा, गहू, मका, ज्वारी, द्राक्ष, भाजीपाला, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालं असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

सरकारला अजूनही अंदाज आलेला दिसत नाही. धूलिवंदन होळी असल्यामुळं बरेच मान्यवर नेते त्यामध्ये गुंतलेले होते. महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा सण आहे. त्याचा आनंद सुटला पाहिजे. पण त्याचवेळी महाराष्ट्रातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. शेतकरी खचून गेला आहे. त्याला उभारी देण्याचं काम राज्य सरकारनं करावं असे अजित पवार म्हणाले. विशेषत रब्बी पिकांचं मोठ नुकसान झालं आहे. जिथं शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं आहे, तिथं नियमांच्या बाहेर जाऊन मदत करावी असे अजित पवार म्हणाले आहेत.