मंत्रिमंडळ विस्तारातील 36 नावे जाहीर; पाहा आहेत कोण-कोण?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या विस्तारात शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा आज (सोमवार) पहिल्यांदा विस्तार होत असून, आज शपथ घेणाऱ्या 36 मंत्र्यांची नावे उघड झाली आहेत. यामध्ये 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार असणार आहेत.

No photo description available.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या विस्तारात शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची यादी राजभवनाला पाठविली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल हे उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा; 14 नावे निश्चित

कॅबिनेट मंत्री :
अशोक चव्हाण
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
विजय वडेट्टीवार
अनिल देशमुख
हसन मुश्रीफ
वर्षा गायकवाड
राजेंद्र शिंगणे
नवाब मलिक
राजेश टोपे
सुनील केदार
संजय राठोड
गुलाबराव पाटील
अमित देशमुख
दादा भुसे
जितेंद्र आव्हाड
संदिपान भुमरे
बाळासाहेब पाटील
यशोमती ठाकूर
अनिल परब
उदय सामंत
के. सी. पाडवी
शंकरराव गडाख
अस्लम शेख
आदित्य ठाकरे

राज्यमंत्री
अब्दुल सत्तार
सतेज पाटील
शंभुराजे देसाई
बच्चू कडू
विश्वजीत कदम
दत्तात्रय भरणे
आदिती तटकरे
संजय बनसोडे
प्राजक्त तनपुरे
राजेंद्र पाटील येड्रावकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar sworn as a DY CM in cabinet expansion Maharashtra government