विनोदाच्या तावडीतून शिक्षणाची सुटका करा - अजित पवार

ब्रह्मा चट्टे
शुक्रवार, 9 मार्च 2018

राज्य सरकारने 1346 शाळा बंद करण्याचा संतापजनक निर्णय घेतला आहे. गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीच सरकार काम करतय का काय असं वाटतयं. राज्य सरकारने शिक्षण द्यायला हवं.  पण सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई - "सुरवातीपासून विनोद तावडे नाराज होते. त्यांना शिक्षण विभाग नकोच होता. त्यांना गृहमंत्री व्हायचं होतं. पण त्यांना दिला नाही. त्यामुळे ते त्या विभागावर अन्याय करत आहेत. त्यामुळे विनोदाच्या तावडीतून शिक्षणाची सुटका करा,'' असा टोला लगावत राष्ट्रवादी पक्षाचे विधीमंडळाचे गटनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

शिक्षणाच्या गंभीर प्रश्नांवर विरोधकांच्या वतीने नियम 293 अन्वये दाखल प्रस्तावावर 
आमदार अजित पवार विधानसभेत बोलत होते. अजित पवार म्हणाले, " राज्य सरकारने 1346 शाळा बंद करण्याचा संतापजनक निर्णय घेतला आहे. गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीच सरकार काम करतय का काय असं वाटतयं. राज्य सरकारने शिक्षण द्यायला हवं.  पण सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी शाळा बंद करायला नको. आपली भाषा मराठी भाषा आहे. इंग्रजी शाळेचे फॅड आलं आहे. त्यामुळे सरकारने मराठी शाळा बंद करायला नको. राज्यातील शिक्षकांची भरती बंद आहे. मुख्याध्यापकांची  नेमणूक होत नाही. पुणे जिल्हा परिषदेने दप्तराचे ओझं कमी करण्याचा जो निर्णय घेतला त्याची माहिती मागवा. तो योग्य असेत तर तो राज्यात राबवा''.

महाविद्यालयात प्राचार्यांच्या नेमणुका होत नसल्याचेही अजित पवार यांनी निदर्शनात आणून दिले.

Web Title: ajit pawar vinod tawde education