Sahitya Sammelan 2023 : भर साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाणांसमोर केला होता आणीबाणीचा विरोध

आज आपण असाच एक १९७५ वर्षीच्या किस्सा जाणून घेणार आहोत.
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2023
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2023sakal

आजपासून वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय. त्यामुळे या संमेलनाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. हे संमेलन मराठी सांस्कृतिक विश्वातील सर्वात महत्त्वाचा पैलू असतो. हल्ली वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत येणारे मराठी साहित्य संमेलन एकेकाळी दर्जेदार साहित्य आणि भाषणांमुळे गाजायचं. आज आपण असाच एक १९७५ वर्षीच्या किस्सा जाणून घेणार आहोत. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2023)

वर्ष १९७५, आणीबाणीचा काळ. २६ जून १९७५ रोजी देशात इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती. या काळात देशात प्रचंड असंतोष होता. अशात साहित्य संमेलन आयोजित करायचं की नाही, हाही प्रश्न होता पण साहित्यप्रेमींचा विचार करुन डिसेंबर १९७५ मध्ये साहित्य संमेलन कराडमध्ये आयोजित करण्याचं ठरवलं आणि सर्वांच्या संमतीने प्रसिद्ध साहित्यिक दुर्गा भागवत यांना त्या वेळच्या साहित्य संमेलनाचं अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2023
Muslim Marathi Sahitya Sammelan| इस्लाममध्ये दहशतवादाची शिकवण नाही : प्रा. जावेदपाशा कुरेशी

आणीबाणी उठविण्यात यावी, अशा आशयाचे एक पत्र इंदिरा गांधी यांना साहित्यिकांतर्फे देण्यात येणार होतं. यासाठी पत्रावर २०० साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या होत्या. मात्र नंतर असं ठरलं की हे पत्र यशवंतराव चव्हाण यांना द्यावं पण साहित्य संमेलनाच्या मांडवाबाहेर त्या पत्राची पाठवणी करण्यात यावी, असं दुर्गा भागवत म्हणाल्या होत्या आणि तसंच करण्यात आलं.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2023
Muslim Marathi Sahitya Sammelan| इस्लाममध्ये दहशतवादाची शिकवण नाही : प्रा. जावेदपाशा कुरेशी

साहित्य संमेलन सुरू झालं. आणीबाणीविषयी प्रखर भूमिका घ्यावी असे, दुर्गा भागवत यांना मनोमनी वाटत होतं पण आणीबाणीविरोधात निषेध कसा नोंदवायचा, हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. त्याच दरम्यान आणीबाणीला विरोध करणारे जयप्रकाश नारायण यांची तब्येतसुद्धा खालावली होती.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2023
Muslim Marathi Sahitya Sammelan | मुस्लिमांनो, फूट पडू देऊ नका! : हुसेन दलवाई यांचे आवाहन

साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवस बाकी होता. आज आणीबाणीविषयी विरोध दर्शवण्याची दुर्गा भागवत यांच्याकडे शेवटची संधी होती. पु. ल. देशपांडे यांचं भाषण सुरू होतं. पु. ल. चं भाषण म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय असायचा पण अचानक त्यांच्याकडून माईक काढून घेण्यात आला आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी, अशी जाहीर विनंती करण्यात आली.

विशेष म्हणजे त्या वेळी प्रेक्षकांमध्ये पु. ल. देशपांडेचं भाषण ऐकायला इंदिरा गांधींचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे काॅंग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाणदेखील होते. या प्रार्थनेमध्ये यशवंतराव चव्हाणदेखील उभे राहिले आणि त्यांनी प्रार्थनेत सहभाग घेतला. अशा पद्धतीने दुर्गाबाई भागवत यांनी आणीबाणीचा विरोध दर्शवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com