यंदाचे साहित्य संमेलन उस्मानाबादला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३वे संमेलन यंदा उस्मानाबादला जानेवारी-२०२० मध्ये होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. संमेलनाच्या नेमक्‍या तारखा संयोजकांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३वे संमेलन यंदा उस्मानाबादला जानेवारी-२०२० मध्ये होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. संमेलनाच्या नेमक्‍या तारखा संयोजकांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या सात-आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा हे संमेलन मिळावे म्हणून प्रयत्नशील होती. दरवेळी त्याकडे काही ना काही कारणांनी दुर्लक्ष होत होते. उस्मानाबादेत एकही संमेलन झालेले नसताना मोठ्या शहरांचाच विचार होत होता. या वर्षी महामंडळाच्या स्थळ निवड समितीने नाशिक व उस्मानाबाद येथील दोन संस्थांची निमंत्रणे पाहणीसाठी निवडली व त्या ठिकाणी पाहणी केली. या समितीने अहवाल महामंडळाला दिला होता. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मोठा वेळ जाईल म्हणून घटनेतील तरतुदीनुसार सर्व सदस्यांना अहवालासह परिपत्रक पाठवून सदस्यांची मते जाणून घेतली. विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह एकोणीस सदस्यांनी मते नोंदविली. साहित्य महामंडळाने एकमताने उस्मानाबादचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. जानेवारीत हे संमेलन उस्मानाबादेत होईल. संयोजकांशी चर्चा करून तारखांचा निर्णय होईल. संमेलनात होणाऱ्या वादांबद्दल विचारले असता वाद उद्‌भवून आणले जातात. मात्र, उस्मानाबादचे संमेलन हे चांगले होईल. वाद होणार नाहीत. तर, संमेलनाध्यक्षही समितीच्या एकमताने निवडला जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan in Osmanabad