
केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यामधील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात कोरोनाचे प्रमाण जसे जसे वाढत आहे तस तसे सोशल अनेक मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत
अकोला : केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यामधील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात कोरोनाचे प्रमाण जसे जसे वाढत आहे तस तसे सोशल अनेक मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. मात्र असे असले तरी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नावाने एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करून आपल्या आवाजातील बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची माहिती दिली आहे.
ऑनलाईन मिटींगमधील संवाद म्हणून एक ऑडीओ क्लिप सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र, त्या क्लिपमधील आवाज माझा नाही’ असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करून माहिती दिली की, मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही.
मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 17, 2021
हेही वाचा - रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?
कोरोनाबाबत कोणताही मोठा निर्णय असेल अथवा खबरदारीच्या काही सूचना असतील तर राजेश टोपे हे पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असतात. पण, काही अज्ञात भामट्यांनी त्यांच्या आवाजाची ऑडिओ क्लीप व्हायरल केली आहे.
या ऑडीओ क्लिपवरून मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, नगर पालिका मुख्याधिकारी यांच्या सोबत व्ही सी वर साधलेला संवाद असल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा -धक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह
काय आहे क्लीपमध्ये ?
1. सर्व मंगल कार्यालयांना नोटीस द्या. जर तिथे विना मास्कचे आणि जास्त संख्येने कोणी आढळले तर त्यांना दंड लावा. पुन्हा सापडले तर गुन्हे दाखल करा आणि मंगल कार्यालय १५ दिवसांसाठी सील करा. कोचिंग क्लासेसवर जाऊन रेड करा. त्यांना नोटीस द्या. मास्क लावले का पाहा. पुन्हा सापडले तर कोचिंग क्लासेस सील करावे लागतील. हे तात्काळ करायचे आहे. काही डॉक्टरचं म्हणणं आहे की हा नवा स्ट्रेन आहे. हिंगोली, परभणी, औरंगाबादमध्ये काही कारवाई होत नसल्याचं कळतंय.
2. अनेकजण खासगी डॉक्टर्सकडे जात आहेत आणि डॉक्टर त्यांना टेस्ट करायला सांगत नाहीत. जर लक्षण असतील तर त्या रुग्णाला कोरोना चाचणी करण्यास पाठवायला हवं.
3. भाजी मंडया, दुकानदारांच्या पुन्हा चाचणी सुरु करा. त्या घरच्यांना तपासा. रुग्ण बाहेर फिरणार नाहीत याची काळजी घ्या.
3.लोक विनामास्क फिरले तर त्यांना दंड केला जाईल आणि कोरोना प्रसारण केले म्हणून दंड केला जाईल.
4. अशी परिस्थिती लागली तर लॉकडाऊन लावावा लागेल. सीसीटीव्ही बंद झाले असतील तर आढावा घ्या. व्हेंटीलेटर सुरु आहेत का ? याचा आढावा घ्या.
या ऑडीओ क्लीपमधील आवाज माझा नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तरी कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नाही. राज्यातील शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, हात धुणे ही काळजी आपण घ्यायलाच हवी.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
संपादन - विवेक मेतकर
अधिक वाचा -
भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर
तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही
बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू