विठुरायाच्या दर्शनाला निघाले हरिण 

देवानंद गहिले
शनिवार, 24 जून 2017

पातूर - दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्‍यातील अटाळी ते पंढरपूर वारकऱ्यांची पायी वारी जात असते. मागील दोन वर्षांपासून सातोणा जंगल परिसरातून पायदळ वारी जात असताना एक हरिण जंगलातून येते व वारकऱ्यांसमवेत तीन दिवस पंढरपूरच्या दिशेने चालू लागते. यावरून दया, माया, वात्सल्य, प्रेमाची भाषा केवळ मानवालाच समजते असे नाही, तर पशुपक्ष्यांना ती जास्त चांगल्या प्रकारे समजते, असे दिसते. 

अटाळी येथे संत भोजने महाराज संस्थान आहे. मागील दहा वर्षांपासून अटाळी ते पंढरपूर वारकऱ्यांची आषाढी एकादशीनिमीत्त पायदळ वारी जाते. ही वारी मेहकर, माजलगाव, गेवराई, आष्टी, येरमाळामार्गे पंढरपूर येथे जाते. या वर्षीही सातोणा मार्गाने वारी जात असताना जंगल परिसरातून हरिण आले व वारकऱ्यांसमवेत चालू लागले. सायंकाळी आष्टी येथे वारकऱ्यांसोबत हरिण मुक्कामी राहिले. हरणाने कीर्तनालाही उपस्थिती लावली. हे हरिण सध्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहे. हा प्रसंग अनुभवल्याने भोजने महाराज सोबत असल्याची वारकऱ्यांची श्रद्धा आहे, अशी माहिती कैलास महाराज मोरखडे, राहणे महाराज यांनी दिली. 

Web Title: akola news deer Pandharpur Wari 2017

व्हिडीओ गॅलरी