महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

विवेक मेतकर
शुक्रवार, 10 जुलै 2020

हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार येत्या ता.12 जुलैपर्यंतच्या कालावधित अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, वीज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्‍यता वर्तविलेली आहे.

अकोलाः  हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार येत्या ता.12 जुलैपर्यंतच्या कालावधित अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, वीज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्‍यता वर्तविलेली आहे.

आठवडाभर मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागात सर्वत्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पडलेल्या मुसळधार सरींमुळे राज्यातील एकूण पाऊस सरासरीच्या पुढेच राहिला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 12 जुलैपर्यंत कोकण विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी असणार आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणीच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, कोकणसह राज्यात काही ठिकाणी शुक्रवारी (10 जुलै) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

राज्याच्या किनारपट्टीच्या भागांत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आठवडाभर कोकण विभागात विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी आहे. मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकणातील काही जिल्ह्यंमध्ये अतिवृष्टीही झाली.

नांदेड जिल्ह्यात ३० मिली मिटर पावसाची नोंद

या कालावधीत कोकणच्या जवळ असलेल्या मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही मुसळधार पाऊस झाला. विदर्भात हलका पाऊस होता, तर मराठवाडय़ातील औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद परिसरात बहुतांश वेळेला पावसाने दडी मारली होती.

या कालावधीत कोकण विभागातील पावसाने राज्यातील पावसाची सरासरी भरून काढून ती ओलांडली. राज्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवडय़ाच्या शेवटी पावसाची सरासरी 300 मिलिमीटरच्या आसपास असते. पण, प्रत्यक्षात पावसाची नोंद 350 मिलिमीटरपेक्षाही अधिक झाली आहे.

विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि गोंदिया हे जिल्हे सोडल्यास इतर जवळपास सर्वच जिल्ह्यंमध्ये पाऊस सरासरीच्या आसपास किंवा त्यापुढे आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर कोकण विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. ९ जुलैला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोठ्या मध्यम प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत 

 संबधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित रहावे. पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Warning of heavy rains till Sunday in these districts of Maharashtra