Akola : शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल मोहन भागवतांचे वक्तव्य चुकीचे, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Mohan Bhagvat
Mohan Bhagvate sakal

अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल केलेल्या विधानाविषयी आमदार मिटकरी म्हणाले की, शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे हिंदू राष्ट्र नव्हते तर ते रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते. हे आम्ही सप्रमाण सिद्ध करून दाखवतो. त्यांचे वक्तव्य अंत्यत चुकीचे आहे. भागवत यांनी आमच्यासोबत चर्चेला यावे, असे जाहीर आवाहन त्यांनी केले.

Mohan Bhagvat
Nagpur : रामटेक लोकसभेवर राष्ट्रवादी दावा ठोकणार ; दोन्ही काँग्रसमध्ये बिनसणार

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्थानिक प्रश्नावरून भाजपचे खासदारांवरही टिका केली. जिल्ह्यात अडीच वर्षापासून जनतेला खासदार दिसले नाहीत. त्यामुळे जिल्हा विकासापासून दूर आहे, त्यामुळे भाजपाने नऊ वर्षे काय केले हे सांगण्यापेक्षा जिल्ह्यात केले हे सांगावे.

संसदेत गेल्या अडीच वर्षामध्ये जिल्ह्याचे प्रश्न विचारल्या गेले नाहीत. , असेही मिटकरी म्हणाले. मुळ मुद्याला बगल द्यायची व हिंदू मुस्लीम दंगल भडकावण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. जाणीवपूर्वक दंगली भडकावल्या जात आहेत. राजकीय फायदा घेण्याचा सरकारचा हेतू आहे, असाही आरोप मिटकरी यांनी केला.

Mohan Bhagvat
Crime News Nagpur : कावीळच्या औषधीसाठी आली अन् बाळ घेऊन गेली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com