मुंढेंनी निलंबित केलेले सर्व अधिकारी कामावर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

वी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निष्काळजीचा ठपका ठेवत निलंबित केलेले तब्बल 24 अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतले.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निष्काळजीचा ठपका ठेवत निलंबित केलेले तब्बल 24 अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतले. यातील कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी आणि सहायक शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी न्यायालयात धाव घेतल्याने त्यांचे निलंबन यापूर्वीच रद्द करावे लागले होते; मात्र प्रशासनाने या दोघांचीही पदावनती केली. 

मुंढे यांनी आयुक्त पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर आळसावलेले आणि एकाच विभागात अनेक वर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. कामात निष्काळजी केल्याचा ठपका ठेवत परिवहन सेवेतील नऊ आणि प्रशासनातील 15 अशा एकूण 24 जणांना मुंढे यांनी निलंबित केले होते. यातील आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यापैकी प्रकाश कुलकर्णी आणि जी. व्ही. राव यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामास्वामी यांनी पुन्हा सेवेत रुजू करून घेतले. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा तीन महिन्यांचा कालावधी उलटल्याने त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे लागले आहे.

Web Title: All officers suspended from Tukaram Munde are regular