'पाऊस मुख्यमंत्री पाहून नाही, तर मुख्यमंत्री घेऊन गेला'

टीम ई-सकाळ
Tuesday, 12 November 2019

सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही 24 तासांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता सोमवार रात्रीपासून मंगळवार रात्री साडेआठ वाजेपर्यंत एवढा वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. 

सोमवार (ता.11) हा दिवस एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा राहिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला 48 तासांचा अवधी दिला होता. राज्यात सर्वात जास्त 105 आमदारांचे बळ हाताशी असलेल्या भाजपला मित्रपक्ष शिवसेनेच्या अटी पूर्ण करता न आल्याने 'आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत,' अशी म्हणण्याची वेळ आली. 

- घटनातज्ज्ञ म्हणतात, '...यामुळे राष्ट्रपती राजवटीची शक्‍यता बळावली'

त्यानंतर राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेनेही मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडी पक्षांची मदत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र, राज्यपालांनी त्यांना दिलेली 24 तासांची मुदत अपुरी ठरली. 

- महाराष्ट्रात कधी, का लागली होती राष्ट्रपती राजवट? जाणून घ्या...

त्यानंतर आता राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही 24 तासांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता सोमवार रात्रीपासून मंगळवार रात्री साडेआठ वाजेपर्यंत एवढा वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. 

- 'वाघाच्या जबड्यात घालून हात, केला स्वत:चाच घात'; भाजप लक्ष्य!

या सगळ्या घडामोडींवर नेटकऱ्यांचं लक्ष्य होतंच. जसजशा घटना घडत होत्या, तसतसे या घटनांविषयीचे विनोद (मिम्स) सोशल जगतात व्हायरल होत राहिले. या पैकी सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या विनोद-मिम्सची मेजवानी खास सकाळच्या वाचकांसाठी. 

Image may contain: 1 person

No photo description available.

No photo description available.

No photo description available.

Image may contain: text

 

No photo description available.

Image may contain: text

Image may contain: text

 

Image may contain: 1 person

No photo description available.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All political parties of Maharashtra trolled by netizens on Social Media