विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही या विरोधकांनी केलेल्या आरोपात कसलेही तथ्य नसून, किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले याची माहिती पेन ड्राइव्ह मध्ये दिली होती. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बुधवारपासून नागपूरात होणाऱ्या पावसाळी आधिवेशनाच्या पुर्व संध्येला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदते मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी 22 हजार कोटींच्या कृषी कर्जवाटपासाठी बँकांना परवाणगी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पावसाळी अधिवेशनात 27 विधेयकांवर चर्चा होणार आहे. राज्यातील केवळ फक्त 5 ते 6 टक्के शेतकऱ्यांनाच कर्जवाटप करण्यात आल्याची टिका विरोधकांनी केली होती. त्याला उत्तर देताना विरोधकांच्या बोलण्यात काही तथ्य नसून आत्तापर्यंत 25 टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे. मागील सरकारने 5 वर्षात 17 ते 18 हजार कोटींची कर्ज वाटप केली होती. आम्ही मात्र, त्यापेक्षा जास्त कर्ज वाटप केली असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 
 
सोमवारी काँग्रसेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवी मुंबई येथील जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याचाही समाचार फडणवीस यांनी घेतला. माझ्यावरील लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या चोवीस तासात जमीन विक्री करण्याचे व्यवहार होतात या आरोपाला काहीही अर्थ नाही. कोणतीही चौकशी करण्याची आमची तयारी असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अंधेरी दुर्घटनेविषयी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. पुलाचे ऑडिट झाले होते की नाही हे तपासावे लागेल. झाले नव्हते तर का झाले नव्हते? झाले असेल तर त्यात काय त्रुटी राहिल्या याची चौकशी केली जाईल.

Web Title: The allegations against the opponents are not fact - Chief Minister