बाजी मारणार शिवसेनेचा बाण अन्‌ भाजपचंच कमळ...!! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 डिसेंबर 2018

मुंबई - चार वर्षे सत्तेत राहून भाजप सरकारवर आगपाखड करणाऱ्या शिवसेनेने आज सरकारच्या कारभारावर स्तुतिसुमने उधळत युतीचे जाहीर संकेत दिले.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मुंबई - चार वर्षे सत्तेत राहून भाजप सरकारवर आगपाखड करणाऱ्या शिवसेनेने आज सरकारच्या कारभारावर स्तुतिसुमने उधळत युतीचे जाहीर संकेत दिले.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

विधानसभेत अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई व रस्ते विकास महामंडळ मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सरकारचे गोडवे गात विरोधकांना "उघडा डोळे बघा नीट' असा टोला लगावला. त्यामुळे आगामी निवडणुकीत युतीनेच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत आज मिळाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर कुरघोडी करत शिवसेना-भाजप युती अभेद्यच राहणार असल्याचे सूतोवाच शीघ्रकवितेतून केले. 

2019 चा संग्राम आला जवळ 
बाजी मारणार शिवसेनेचा बाण... 
अन्‌ भाजपचंच कमळ...!! 
अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कोटी केली. 

 

दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या चार वर्षांच्या कारभारावर टीका करताना शिवसेनेचे मुखपत्रातील अग्रलेख वाचून दाखवले. भाजप सरकार, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना या अग्रलेखातून वाहिलेल्या लाखोल्या व कारभारावर सोडलेले टीकेचे बाण याचा उल्लेख करत शिवसेना मंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्यात चार वर्षांत झालेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा वाढता आलेख मांडत आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कामगिरीचा समाचार घेतला. शिवसेना मंत्र्यांच्या विधानात विसंगती असल्याचे सांगत विरोधकांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला; पण आमची युती अभेद्य आहे. सरकारची कामगिरीदेखील उत्तम आहे, असे सांगत भाजपबरोबरील संबंध सुधारल्याचे संकेत त्यांनी दिले. 

Web Title: alliance after four years bjp & Shiv Sena