युती झाली तर सर्वत्र, अन्यथा कुठेच नाही!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

मुंबई : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती झाली तर ती सर्व ठिकाणी होईल, अन्यथा होणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. 

मुंबई : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती झाली तर ती सर्व ठिकाणी होईल, अन्यथा होणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. 

राज्यभर युतीचा प्रस्ताव आला तर भाजपशी युती होईल, पण ठराविक ठिकाणी युती करायची आणि इतर ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढायचे, अशी परिस्थिती उद्‌भवणार असेल तर युती होणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली. 
सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. निवडणुकीची घोषणा होताच युतीच्या हालचालींना वेग येईल; परंतु त्याच्या आधीच शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करून भाजपची कोंडी केल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. 

मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर यांसह दहा महत्त्वाच्या महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार आहेत. या महापालिकांच्या निवडणुका शिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असल्याने युती होईल की नाही, या प्रश्‍नाच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा वेळी काही महापालिकांमध्ये युती करण्याचा प्रस्ताव भाजपकडून येण्याची शक्‍यता असल्याने शिवसेनेने अशा प्रकारे युती न करण्याची भूमिका घेतली आहे. 

Web Title: alliance everywhere, otherwise nowhere, says shiv sena