निवडणुका एकत्र घेतल्या तरच युती?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई - सलग चार वर्षे सत्तेच्या संसारात असताना शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला तरी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार असतील तरच युतीचा फेरविचार होऊ शकतो, असा सूर शिवसेनेने आळवल्याची सूत्रांची माहिती आहे. 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुमारे तीन तास चर्चा केली. या दोन्ही मित्रपक्षात आलेली टोकाची कटूता संपवण्याचा हा निर्णायक प्रसंग असल्याचे राजकीय तज्ञांना वाटते. मात्र, भाजपच्या राजकीय डावपेचावर शिवसेनेचा विश्‍वास राहिलेला नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत युती होण्याची शक्‍यताच नसल्याचे शिवसेना नेते सांगत आहेत. भाजपला लोकसभेसाठी शिवसेनेची गरज आहे. त्यासाठी अमित शहा यांनी मित्रपक्षांसोबत गोडीगुलाबीचे राजकारण सुरू केले. मात्र, शिवसेनेने या राजकारणावर कुरघोडी करत लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार असतील तरच युती शक्‍य असल्याचे स्पष्ट करत कोंडी केल्याचे मानले जाते. 

Web Title: alliance only took together Elections