छगन भुजबळ यांना पुण्याला जाण्यास परवानगी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुण्यातील पक्षाच्या सभेला जाण्यासाठी पीएमएलए विशेष न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली . 

10 जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात सभा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून आग्रह करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करताना मुंबईबाहेर न जाण्याची अट घातली होती. त्यामुळे पुण्यातील सभेला जाण्यासाठी छगन भुजबळ यांनी अर्जाद्वारे विशेष न्यायालयाला विनंती केली होती. ही विनंती मान्य करत त्यांना बुधवारी न्यायालयाने परवानगी दिली आहे. 

Web Title: Allow Chhagan Bhujbal to go to Pune