Amazon ने पाठवलं बनावट घड्याळ; तरुण म्हणाला, आदित्यजी मदत करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon ने पाठवलं बनावट घड्याळ; तरुण म्हणाला, आदित्यजी मदत करा!

Amazon ने पाठवलं बनावट घड्याळ; तरुण म्हणाला, आदित्यजी मदत करा!

मुंबई : कोरोना काळात अनेकांचा ऑनलाईन शॉपिंगकडे (Online Shopping) कल वाढल्याचे चित्र पाहण्या मिळत आहे. मात्र, वाढत्या ऑनलाईन खरेदीमुळे फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये देखील (Fraud) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असाच काहीसा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. ग्राहकाने अ‍ॅमेझॉनवरून अ‍ॅपलचे Series 7 घड्याळाची ऑर्डर दिली होती. मात्र, ग्राहकाने ज्यावेळी बॉक्स उघडला त्यावेळी त्यात बनावट घड्याळ पाठवल्याचे समोर आले. (Amazon Sent Duplicate Apple Watch)

दरम्यान, या सर्व घटनेनंतर संबंधित ग्राहकाने याबाबत अ‍ॅमेझॉनकडे (Amazon) तक्रार केली. परंतु, कंपनीने ग्राहकाला पैसे परत करण्यास नकार देत, आपल्याला बनावट वस्तू मिळाल्याबद्दल खेद व्यक्त केला. तसेच याबाबत आम्ही संबंधित विभागाशी चर्चा केली असून, तुम्हाला योग्य वस्तू पाठविल्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम्ही यासाठी आपल्याला कोणतेही रिफंड किंवा रिप्लेसमेंट (Refund) देऊ शकत नसल्याचे उत्तर अ‍ॅमेझॉनकडून ग्राहकाला देण्यात आले आहे.

मदतीसाठी आदित्य ठाकरेंना केले टॅग

मागवलेली वस्तू बनावट असल्याचे तसेच त्याबाबत रिफंड किंवा रिप्लेसमेंट देण्यास अ‍ॅमेझॉनने नकार दिल्यानंतर या प्रकरणी फसवणूक झालेल्या एमके. कौर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टॅग करत मदतीची विनंती (Help) केली आहे. यामध्ये कौर यांनी संबधित कंपनीने अ‍ॅपल स्मार्टवॉच (Smart Watch) ऐवजी त्या सारखेच दिसणारे बनावट घड्याळ पाठविल्याचा उल्लेख केला आहे. कौर यांनी पार्सल आल्यानंतर ते उघडतांनाचा देखील व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे.

Web Title: Amazon Sent Duplicate Watch Customer Tag Aditya Thackeray For Help

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top