
Ambedkar Jayanti 2025: देश-विदेशात नुकतीच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली. पण यंदा महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये आणि छोट्या शहरांमध्येही या भीम जयंती सोहळ्यात डीजेचा अत्यंत भीषण दणदणाट ऐकू आला. यामुळं या रॅलीजमध्ये सहभागी झालेल्या आंबेडकरी जनतेलाच लहान मुलांना या डीजेच्या उच्च आवाजाच्या पातळीचा त्रास सहन करावा लागला.
तसंच वृद्ध लोक आणि पशु-पक्षांच्याही आरोग्यावर परिणाम होऊन याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. यापार्श्वभूमीवर आता आंबेडकरी समाजातील काही विवेकवादी लोकांनी आनंदाच्या भीमजयंती महोत्सवाला विकृत स्वरुप देणाऱ्या या डीजेच्या दणदणाटाला कडाडून विरोध केला आहे. यासाठी संपूर्ण समाजानं एकत्र येत पुढील वर्षापासून यात कसा बदल करता येईल, याची आता चर्चा सुरु झाली आहे.