अंबेजोगाईच्या "सम्यक'ची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - अंबेजोगाईतील दहावीची परीक्षा दिलेला सम्यक सचिन कर्णावट याने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी खाऊच्या पैशाची व पॉकेटमनीची बचत करून तब्बल 25 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा निवासस्थानी आज सुपूर्त केला. अवघ्या 16 व्या वर्षात सामाजिक बांधिलकी जपल्याचा आनंद सम्यकच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

सम्यकने सध्या 10वीची परीक्षा दिली असून, बालवयापासूनच तो सामाजिक बांधिलकी जपतोय. गेल्या 10 वर्षांपासून तो वाढदिवस साजरा न करता खाऊच्या पैशातून अनाथाश्रम व वृद्धाश्रमात मिठाई वाटपाबरोबर विविध वस्तू देत आहेत. अनाथ मुलांच्या व वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम तो न चुकता करतोय, यात त्याच्या वडिलांचं योगदान खूप मोठं आहे. सम्यकचे वडील सचिन कर्णावट हे आपला छोटासा ऑप्टिकल दुकानाचा व्यवसाय सांभाळून मुलाला सामाजिक बांधिलकीची शिकवण देत आहेत. 

मागील वर्षी सम्यकने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फेसबुक पेजवर एका लहान मुलाने वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी दिल्याचा फोटो पाहिला होता. हा फोटो पाहून सम्यकची सामाजिक बांधिलकी गप्प बसू देईना, त्यातूनच ही प्रेरणा मिळाल्याचं त्याने सांगितलं. त्याने वडिलांना ही कल्पना सांगितली, वडिलांनीही त्यास मान्यता दिली. आपणही असाच निधी देऊ शकतो, या कल्पनेनेचं त्याला आनंद झाला. त्याचे वडील सचिन यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या फेसबुक पेजवर संदेश पाठवून सविस्तर माहिती देऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना भेटीचे निमंत्रण दिले होते.

Web Title: ambejogai news Social commitment Chief Minister's Assistance Fund