अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांचे दुपारी साडे आकराच्या दरम्यान मुंबईत आगमन झाले. शहा या भेटीत महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या संवादात दोन्ही राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघानूसार आढावा घेतला जाणार आहे. या बेठकांना दादर येथील मुंबई प्रदेश भाजपाच्या वसंत सृती कार्यालयात या बैठकांना सुरवात झाली आहे.

शहा यांचे मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी स्वागत केले. यानंतर शहा यांनी दादर येथील पक्षाचे कार्यालय वसंतस्मृती येथे बैठकीला सुरूवात केली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राज्यातील आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. शहा मुंबई भेटीत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना भेटणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah communicates with BJP leaders