अमित शहा घेणार उद्धव ठाकरेंची भेट

वृत्तसंस्था
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

विधानसभा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली राजकीय स्तरावर केल्या जात आहेत. त्यातच आता भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेणार आहेत.

मुंबई : विधानसभा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली राजकीय स्तरावर केल्या जात आहेत. त्यातच आता भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा 56 जागांवर विजय झाला. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाची मागणी केली जात आहेत. तर भाजप मुख्यमंत्रिपद देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे.

आता अमित शहा हे येत्या 30 ऑक्टोबरला मुंबईत दाखल होणार आहेत. त्यावेळी ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah will meet Uddhav Thackeray on Matoshree in Mumbai