Amit-Shah-and-Uddhav-Thackeray
Amit-Shah-and-Uddhav-Thackeray

अमित शहा - उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दूरध्वनीवरून अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडीबाबत चर्चा झाल्याचे समजते. मराठा आरक्षण आंदोलनाचा पेच यावर दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचाही दावा सूत्रांनी केला. राज्यातील सामाजिक परिस्थिती व कायदा सुव्यवस्थेवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. शिवाय, राज्यसभा उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. भाजप पुरस्कृत एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा, यावरही दोन्ही नेत्यांत संवाद झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तार यासह राज्यातील इतर राजकीय प्रश्नांवरदेखील चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या सर्व मुद्द्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा लवकरच बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com