शाब्बास गं रणरागिणी! उधळलेल्या बैलाला पोरीनं झटक्यात घातली वेसन

खासदार अमोल कोल्हे यांनी खास व्हिडिओ आपल्या सोशल मिडियावर शेअर केला आहे.
Amol Kolhe
Amol Kolhe Team eSakal

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) नेहमी आपल्या अंदाजासाठी चर्चेत असतात. त्यांच्या लोकसभेतील भाषणांपासून, ते घोडेस्वारीपर्यंतचे सर्व व्हिडिओ (Video Viral) सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. त्यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी फेसबूकवर शेअर केलेला व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका लहान मुलीलं बैलाला पकडल्याचं दिसतंय.

Amol Kolhe
'वाघाला' त्याच्या क्षमतांवर विश्वास, म्हणून तो कुणाला घाबरत नाही - रोहीत पवार
Amol Kolhe
महाविकास आघाडीतील आमदार आपल्या संपर्कात,भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा दावा

अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बैलगाडा शर्यतीतीलच असल्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये गाडीला बैल जुंपत असताना, बैल उधळताच ती लहान मुलगी मोठ्या जीकरीने ती त्याला पकडताना दिसतेय. शाब्बास गं रणरागिणी!… असं म्हणत अमोल कोल्हेंनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com