Amol Mitkari And Devendra Fadnavis
Amol Mitkari And Devendra Fadnavisesakal

अर्थ अगोदर समजून घ्या, मिटकरींचा 'हनुमान चालीसा'वरुन फडणवीसांना सल्ला

खरा अर्थ अगोदर समजून घ्या !

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे रविवारी (ता.१५) सभा पार पडली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करुन टीका केली आहे. ते म्हणतात, आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाजाचा कर्कश भोंगा ऐकला !त्या भोंग्यातुन हनुमान चालीसामधील चौपाईचा आधार घेत 'पैसा' असा उल्लेख आला. (Amol Mitkari Advise Devendra Fadnavis Understand Meaning Of Hanuman Chalisa)

Amol Mitkari And Devendra Fadnavis
"बाळासाहेब वाघ होतेच पण आता एकच वाघ, नरेंद्र मोदी"

रात्रंदिवस पैसा पैसा करणाऱ्या भाजपाच्या ह्या भरीव नेत्यांनी खरा अर्थ अगोदर समजून घ्यावा 'रामदुआरे तुम रखवारे ! होत न आज्ञा बिनु पईसारे ll याचा अर्थ, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला आहे. आजच्या सभेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेकांचा समाचार घेतला.

Amol Mitkari And Devendra Fadnavis
मुंबई वेगळी करायची आहे, आम्हाला पण.....; फडणवीसांचा शिवसेनेला इशारा

औरंगाबादच नामांतर संभाजीनगर भाजपच करणार असल्याचा विश्वास या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला. यावेळी हनुमान चालीसातील काही भागाचे पठण फडणवीस यांनी केले. त्यातील दुरुस्ती अमोल मिटकरी यांनी त्यांना सूचवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com