महाराष्ट्रात साचलेली घाण जनताच साफ करेल; मिटकरींची भाजपावर टीका

मंगळसुत्र चोराची लावारिस कार्टी आता डिजीटिल रित्या लावारिस झाली-अमोल मिटकरी
amol mitkari
amol mitkariamol mitkari

गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेत्यांनी आंदोलनाचा सिलसिला सुरुच ठेवला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शनिवारी (ता.२६) दिवसभर दापोलीमध्ये (Dapoli) अनिल परब यांच्याविरोधात रान पेटवलं. त्यानंतर आज (ता.२७) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरलं. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी वरील तिघांवर ट्वीटरद्वारे टीकास्त्र डागलंय.

अमोल मिटकरी यांनी सोमय्या, पडळकर आणि खोत यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, ‘हाय व्होल्टेज ड्रामेबाजांना महाराष्ट्रातील जनता आता कंटाळली आहे. काल कोकणात तोतला व आज इकडे मंगळसुत्र चोर जो थयथयाट करत आहेत तो थयथयाट राज्यातील हुशार तरुणाई पाहत आहे. हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे. आगामी काळात ही घाण जनताच साफ करेल. #मंगळसुत्रचोर अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केलीय.

amol mitkari
Photo l अखेर ड्रोनचा वापर करुन स्मारकावरती फुले टाकली- पडळकर

त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे यात ते म्हणतात, मंगळसुत्र चोराची लावारिस कार्टी आता डिजीटिल रित्या लावारिस झाली आहेत. त्यांना बरोबर कळलय आपला गडी मंगळसुत्र चोर आहे म्हणुन... असा टोलाही हाणला.

amol mitkari
शरद पवारांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये- सदाभाऊ खोत

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या रिसॉर्टबाबत एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी किरीट सोमय्या यांनी दिवसभर आंदोलन करत गोंधळ घातला. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा मेंढपाळांच्या हस्ते करण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केलेले आंदोलन यावरून आता राजकीय नेत्यांची उलट-सुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com