पक्षनिधीसाठी रक्‍कम  घेतली - दानवे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मुंबई - नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून पक्षनिधीसाठी रक्‍कम घेतली असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे केले आहे. 

मुंबई - नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून पक्षनिधीसाठी रक्‍कम घेतली असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे केले आहे. 

नाशिकमध्ये पक्षाच्या इच्छुकांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत निवडणूक आयोगाने पक्षाकडे विचारणा केली होती. यावर स्पष्टीकरण देताना दानवे यांनी म्हटले आहे की, "निवडणूक निधी म्हणून इच्छुक उमेदवारांकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे हे अधिकृत आहे.' तिकीटवाटपाच्या प्रक्रियेत उनेदवारीसाठी दोन लाख रुपयांची रक्‍कम भाजप पदाधिकाऱ्यांकडून घेतली जात असल्याची चित्रफीत सोशल मीडियावरून प्रसारित झाली होती. याबाबत निवडणूक आयोगाकडून विचारणा होत होती. 

Web Title: amount of funds for the party