Thur, Sept 21, 2023

Accident :दर्यापूर अंजनगाव मार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, तर...
Published on : 23 May 2023, 4:22 am
नागपूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली. आता त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावर भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये ५ जणाचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बसमधून १२ प्रवासी प्रवास करीत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने बसला जबर धडक दिली. यात ५ जणाचा मृत्यू झाला. तर ७ जण गंभीर जखमी असून जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे हलविण्यात आले. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णलायत दाखल केले आहे. यासंदर्भात अधिक तपास खल्लार पोलीस करत आहेत.