'त्या' व्हिडीओचा उलगडा होणार? अमृता फडणवीस धमकी प्रकरणी अनिक्षाला पोलीस कोठडी | Amruta Fadnavis Blackmail Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis files FIR against designer offering Rs 1 crore

Amruta Fadnavis News : 'त्या' व्हिडीओचा उलगडा होणार? अमृता फडणवीस धमकी प्रकरणी अनिक्षाला पोलीस कोठडी

Amruta Fadnavis Blackmail Case : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी देण्यात आलेल्या तक्रारीत अमृ्ता फडणवीस यांनी १ कोटी लाच देण्याचा प्रयत्न करुन ब्लॅकमेल करण्यात येतं होतं असा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणात अटकेत असणाऱ्या आरोपी अनिक्षाला आज विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. या प्रकरणी तिला २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात डिझायनर अनिक्षा जयसिंघानी तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. काल विधीमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली होती. प्रसिद्ध बुकी अनिय जयसिघांनी यांना सोडवण्यासाठी अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच ऑफर केली होती.

नेमकं प्रकरण काय आहे?

फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांच्या पत्नी अमृता या 16 महिन्यांपूर्वी अनिक्षाच्या संपर्कात आली होती, ती (अनिक्षा) अनेक वेळा फडणवीस यांच्या घरी आली होती आणि त्यांचा विश्वास जिंकला होता. अनिक्षा - जी नोव्हेंबर 2021 पासून फडणवीस कुटुंबाच्या संपर्कात होती - तिने अमृताला काही डिझायनर कपडे, दागिने आणि इतर वस्तू दिल्या होत्या, तिला तिच्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा प्रचार करण्याची विनंती केली होती जेणेकरून ती कुटुंबाला मदत करू शकेल.

त्यानंतर, त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, अनिक्षा अमृता यांनी तिच्या वडिलांना (अनिल जयसिंघानी) एका फौजदारी खटल्यात सोडवण्यासाठी 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा अमृता फडणवीस या भानगडीत पडल्या नाहीत आणि त्यांनी तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला, तेव्हा तिने (अनिक्षा) धमक्या आणि ब्लॅकमेलचा अवलंब केला.

हेही वाचा - ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

फडणवीसांनी विधानसभेत सांगितले की, या मुलीने कुठेतरी बॅगेत पैसे भरतानाचा व्हिडीओ बनवला आणि नंतर तीच बॅग फडणवीसांच्या घरात काम करणाऱ्या बाईला देतानाचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर हे व्हिडीओ दाखवून अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहेत, हे व्हिडीओ बाहेर आले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल असे ब्लॅकमेलिंग सुरू झालं.

यानंतर अमृता फडणवीस यांनी ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना सांगीलते त्यानंतर चौकशीची चक्रे फिरली आणि अनिक्षाला अटक करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणात उल्लेख झालेल्या त्या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या प्रकरणात आता काय खुलसे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनिक्षाला २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान तिच्या चौकशीत काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.