अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल; लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

अमृता फडणवीस यांच्या ट्विटर पोस्टवर केवळ टीकाच नाही तर, अनेकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. जीवनात ही घडी अशीच राहू दे अशा शब्दांत फडणवीस दाम्पत्याला काव्यमय शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

मुंबई :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या लग्नाचा 17 नोव्हेंबरला वाढदिवस होता. फडणवीस दाम्पत्यावर त्यांच्या मित्र परिवाराने आणि शुभचिंतकांना शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानणारी एक पोस्ट अमृता फडणवीस यांनी ट्विटवर शेअर केली. त्यानंतर मात्र त्यांना ट्विटर वर ट्रोल व्हावं लागलं.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नेटकऱ्यांनी पूरग्रस्त, तसेच अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचा विषय उपस्थित करून अमृता फडणवीस यांना ट्रोल केलं. 

शुभेच्छांचाही वर्षाव
अमृता फडणवीस यांच्या ट्विटर पोस्टवर केवळ टीकाच नाही तर, अनेकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. जीवनात ही घडी अशीच राहू दे अशा शब्दांत फडणवीस दाम्पत्याला काव्यमय शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर एकाने ही पोस्ट करून तुम्ही लोकांना फुकट विषय दिलाय, अशी टीका केलीय. तसेच पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं तुमचं स्वप्न साकार होवो, अशा शुभेच्छाही त्यांना देण्यात आल्या आहेत.

मराठी अस्मितेचा हुंकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे : शरद पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amruta fadnavis gets trolled after marriage anniversary photo