अमृता फडणवीसांच्या निशाण्यावर पटोले; म्हणाल्या,नन्हे पटोले...

अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदींना सुर्याची उपमा देत नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे.
Amruta Fadnavis,Nana Patole
Amruta Fadnavis,Nana PatoleEsakal

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis )या नेहमीच त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात आताही त्यांनी सोशल मीडियावर नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी नरेंद्र मोदींना (Narendra Modi) सुर्याची उपमा दिली आहे. सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! असा टोलाही लगावला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत. भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्याने राजकीय नेते आरोप- प्रत्यारोप करत आहेत. तर पटोलेंना अटक करा अशी मागणीही केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील त्यांच्या खास शैलीत नाना पटोलेंना टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले!”अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदींना सुर्याची उपमा देत नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे.

Amruta Fadnavis,Nana Patole
मोदींबद्दलचं वक्तव्य पटोलेंच्या अंगाशी येणार; चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक (Zilla Parishad and Panchayat Samiti elections) प्रचारा दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात निसटता पाय मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. या प्रचार सभेत नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘मी मोदीला (Narendra Modi) मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे दादागिरी करणारे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याने राज्यभरात गदारोळ सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com