Nitin Gadkari Birthday : "अंदाज कुछ अलग हैं उनके सोचने का…"; अमृता फडणवीसांच्या गडकरींना हटके शुभेच्छा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amruta fadnavis Birthday wishes to Nitin Gadkari  tweets special couplets Nitin Gadkari birthday

Nitin Gadkari Birthday : "अंदाज कुछ अलग हैं उनके सोचने का…"; अमृता फडणवीसांच्या गडकरींना हटके शुभेच्छा!

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे.गडकरी यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. राज्याते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील त्यांच्या खास अंदाजात ट्वीट करत गडकरी यानी शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी खास शायरी पोस्ट करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. "अन्दाज़ कुछ अलग हैं उनके सोचने का, सबको मंजिल का शौक है और उन्हें रास्ते बनाने का" असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

यासोबतच त्यांनी नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमचे दूरदर्शी नेते नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी देशभरात मोठ्या प्रमाणात रस्ते उभारून आपला ध्येयापर्यंतचा प्रवास सोपा केला आहे! असेही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. त्यांनी नितीन गडकरी यांच्यासोबतचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

दरम्यान आज देशभरातून गडकरी समर्थक त्यांना शुभेच्छा द्यायला नागपुरात दाखल होत आहेत. तसेच नागपूरच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. यादरम्यान गडकरींच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी रोगनिदान शिबिरांचं आयोजन देखील करण्यात आलं. गडकरी यांनी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.