Andheri By-Election: ऋतुजा लटकेंच्या प्रचारार्थ बाईक रॅली; अरविंद सावंत यांनी राणेंचा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andheri By-Election

Andheri By-Election: ऋतुजा लटकेंच्या प्रचारार्थ बाईक रॅली; अरविंद सावंत यांनी राणेंचा...

Andheri, Mumbai : 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या प्रचारार्थ आज मुंबईत बाईक रॅली काढण्यात आलेली आहे. या रॅलीमध्ये शेकडो शिवसैनिक सहभागी झालेले आहेत. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सावंतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा खरपूस समाचार घेतला.

नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खा. अरविंद सावंत म्हणाले की, पन्नास पक्ष बदलणाऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. यांची नीतिमूल्य आणि नैतिक अधिष्ठान काय? असा प्रश्न अरविंद सावंतांनी उपस्थित केला. ''आम्ही सहानुभूतीवर ही निवडणूक लढवत नसून आता जनताच पेटून उठलेली आहे. पेटलेली मशाल आमच्या हातात असल्याने विजय निश्चित आहे.'' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा: Mumbai-Goa Highway: १८ हजार बळी घेणारा महामार्ग; संतापलेल्या 'पेण'करांनी...

मुंबईतल्या कुलाबा ते रिगल सिनेमापर्यंत बाईक रॅलीयं आयोजन करण्यात आलेलं होतं. या रॅलीमध्ये १०० ते १५० बाईक सहभागी झाल्या होत्या. मतदारसंघात वातावरणनिर्मितीसाठी या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं.

दरम्यान, भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिलेली आहे. शिंदे गट आणि भाजपने एकत्रित मिळून मुरजी पटेल यांच्यामागे ताकद उभी केलेली आहे. उभय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. त्यामुळे नेमकं कोण बाजी मारणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.